1 सप्टेंबरपर्यंत ई पास लागू राहण्याची शक्यता
टीम : ईगल आय मीडिया
राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि सध्या सुरू असलेला गणेशोत्सव यामुळे निर्बंध लगेचच शिथिल करू नयेत, प्रवासास मुभा दिल्यास प्रवासी संख्या वाढेल आणि त्यातून करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच गणेशोत्सव संपल्यावर किंवा 1 सप्टेंबर पासून राज्यात ई पास रद्द केला जाण्याची शक्यता आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सूचक वक्तव्य केले असले तरी तूर्तास राज्यात इ पास कायम राहणार असल्याचे दिसते.
आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास तसेच कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले असले तरी राज्यात मात्र ई पास अजूनही शक्तीचा आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी अन्य शहरी भागांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशा वेळी प्रवास रद्द केल्यास रुग्णांची संख्या अधिक वाढू शकते. यामुळे राज्यात अजूनही दुसऱ्या जिल्ह्य़ात जाण्याकरिता ई-पास आवश्यक असेल. बहुधा १ सप्टेंबरपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.