टीम : ईगल आय मीडिया
फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील 40 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणाता आता ईडीने भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज्याचे मंत्री विश्वजित कदम यांचे ते नातेवाईक आहेत.
नगर जिल्ह्यातल्या संगमनेरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला. अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. त्यानंतर तयांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारी करणाऱ्यांशी झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली. त्यानंतर बांधकामा क्षेत्रामध्ये मोठं नाव त्यांनी कमावले. कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.
दरम्यान, भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत 1 कोटी 83 लाखांचा दंड केला होता. 2007 मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. 2017 साली इन्कम टॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते.