Dhfl घोटाळ्यातील ईडी ची कारवाई
टीम : ईगल आय मीडिया
दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने कर्ज घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) dhfl मोठी कारवाई करीत या घोटाळ्याशी संबंधित शिंदे यांची कन्या प्रीती श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची अंधेरीतील व्यावसायिक मालमत्ता जप्त केली आहे.
ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
अंधेरी पूर्व येथे कालेडोनिया या इमारतीत प्रीती व राज यांच्या मालकीच्या जवळपास १० हजार ५५० स्क्वेअर फिटच्या दोन कमर्शियल मालमत्ता असून त्या ईडीने जप्त केल्या आहेत. ही तात्पुरत्या स्वरूपातील जप्ती असून जप्त मालमत्ता ३५.४८ कोटी रुपये इतक्या किमतीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दिवाळखोरीत निघालेल्या डीएचएफएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांनी पीएमसी बँकेत केलेल्या कर्ज घोटाळ्याच्या अनुषंगाने मनी लाँडरिंगचाही गुन्हा दाखल आहे. त्याच गुन्ह्यात मेसर्स जिंदल कंबाइन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स ओरलँडो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे मालक असलेल्या प्रीती व राज श्रॉफ यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
पीएमसी बँकेतील दिवाण हाउसिंग फायनान्स कंपनीस (डीएचएफएल) दिलेले ३ हजार ६८८.५८ कोटीं रुपये कर्ज घोटाळा उघड झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. नंतर येस बँकेतील या कंपनीचा कर्ज घोटाळा पुढे आला. या प्रकरणात वाधवान बंधूंना अटक करण्यात आली आहे व त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. डीएचएफएलला दिवाळखोरीत काढण्यात आले असून त्याची प्रक्रिया नोव्हेंबर २०२० मध्येच सुरू झालेली आहे.