एकनाथ खडसे यांनाही ईडी ची नोटीस

एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार?

टीम : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली असून उद्या (8जुलै) रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने पाठवलेल्या नोटीसनुसार खडसे यांना उद्या म्हणजेच गुरुवारी (8 जुलै) सकाळी 11 वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी अटक केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ईडीने भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी खडसे यांनाही समन्स पाठवले आहेत.

या प्रकरणाची कारवाई थांबवण्यासाठी एकनाथ खडसे हायकोर्टात गेले आहेत. हायकोर्टाने ईडीला सुनावणी सुरु असेपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. पण चौकशीबाबत अद्याप कोणतेही आदेश दिलेले नाहीत. कोर्टाचे आदेश असल्याने एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई होणार नाही. मात्र, त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे

ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.

Leave a Reply

error: Content is protected !!