कोणत्याही बँकेतील खाते चालणार : ऑफलाईन अर्ज स्वीकारणार, अर्ज स्वीकारण्याची वेळ वाढवली.
टीम : ईगल आय मीडिया
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना निवडणूक आयोगाने आज दिलासा देणारे 3 निर्णय घेतले आहेत. त्यानुसार आता उमेदवारी अर्ज online तसेच ofline सुद्धा स्वीकारण्यात येणार आहे. तसेच निवडणूक खर्चाचा हिशेब देण्यासाठी नवीन बँक खाते काढण्याची गरज नसून सध्या सुरू असलेले राष्ट्रीय आणि सहकारी बँकेचे खाते सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. या संदर्भात आज निवडणूक आयोगाने आदेश काढू संबंधितांना सूचना केल्या आहेत.
याशिवाय जात प्रमाणपत्र पडताळणी साठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला उशीरा पर्यंत अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 30 डिसेंम्बर अखेरचा दिवस असल्याने अर्ज स्वीकारण्याची वेळ सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
सध्या राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. 29 डिसेंम्बर अखेर राज्यात 3 लाख 32 हजार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. Online अर्ज भरण्यासाठी राज्यभरात सायबर कॅफे वर गर्दी झाल्याने नेटवर्क जॅम होत आहेत, सर्व्हर डाऊन होणे, स्लो चालणे अशा प्रकाराने उमेदवारांची गैरसोय झाली आहे. शिवाय बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी ही मोठी अडचण येत आहे.
हे लक्षात घेता निवडणूक आयोगाने राष्ट्रीय कृत बँकेसह सध्या सुरू असलेले सहकारी बँकेतील खाते सुद्धा ग्राह्य धरले आहे, तसेच उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची वेळ वाढवली आहे.