सलग तीन दिवसांपासून 10 हजारांहून अधिक रुग्ण
टीम : ईगल आय मीडिया
राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने ११ हजारांचा आकडा पार केला आहे. मागील 24 तासांत राज्यात ११ हजार १४१ नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. सततच्या वेगाने वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे.
आज राज्यात एकूण ३८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४७ इतकी होती. आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.३६ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ६८ हजार ०४४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.१७ टक्के इतके झाले आहे.
तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६८ लाख ६७ हजार २८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख १९ हजार ७२७ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.१६ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ४ लाख ३९ हजार ०५५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ४ हजार ६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.