ई-पास रद्द : लॉक डाऊन कायम

राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत शाळा, सिनेमा,जिम बंदच

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात 30 सप्टेंबर पर्यंत लॉक डाऊन कायम ठेवण्यात येत असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान, राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त केल्यानंतर आता ठाकरे सरकारने खासगी वाहतुकीला परवानगी देतानाच ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनलॉक ४ संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्य सरकारकडून ‘अनलॉक ४’ साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

‘अनलॉक ४’ ची नियमावली जाहीर करताना केंद्र सरकारने राज्यांतर्गत व आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची गरज नसल्याचं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ई पास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

हे राहील बंद
* शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद
* चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह बंद
* केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली नसेल तर आंररराष्ट्रीय प्रवासाला बंदी
* मेट्रो बंदच राहणार
* सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी

राज्य सरकारने निमयावली जाहीर केली असून ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे.
राज्य सरकारने खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी दिली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरु होण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क,जिम्स, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत.

हे चालू होणार !
* हॉटेल आणि लॉज यांना १०० टक्के क्षमतेने सुरु
* खासगी कार्यालय क्षमतेच्या ३० टक्के कर्मचाऱ्यांसोबत काम सुरु
* प्रवासी, मालाच्या आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची अट रद्द.
* खासगी बस, मिनी बसना परवानगी
* कोणत्याही अटीविना शारिरीक हालचालींसाठी परवानगी.

Leave a Reply

error: Content is protected !!