मतदान संख्येत तफावत : Evm वर संशय

स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यायालयात जाणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपुर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक निकालाची अंतिम मतदान संख्या आणि प्रत्यक्षात झालेले मतदान यामध्ये तफावत असल्याचा दावा करून स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यायालयात जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रवक्ते रणजित बागल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

यासंदर्भात प्रसिद्धी दिलेल्या निवेदनात रणजित बागल पुढे म्हणाले की, पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीतच्या निवडणुक प्रक्रीयेवर व EVM च्या विश्वासार्हर्तेबाबत संशय घेण्यास वाव निर्माण झाला आहे. कारण पोटनिवडणूकीत प्रत्यक्षात मतदान झालेली मतदानाची आकडेवारी व मतमोजणीची आकडेवारी यांमध्ये तफावत आढळून येत आहे..

माझी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढलेल्या सर्व उमेदवारांना (अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह,सर्वांनाच) विनंती आहे की आपण ही या विषयावर आमच्या सोबत यावे अथवा स्वतंत्र्यपणे न्यायालयात जावे व सत्यता बाहेर आणण्याचा प्रयत्न करावा.. निवडणूक संपली,मतभेद संपले आहेत परंतु हा संशयास्पद विषय सर्वच उमेदवारांनी गांभीर्यपूर्वक मनावर घेणे गरजेचे आहे असे मला वाटते..
आपलाच,
रणजित बागल
राज्य प्रवक्ता,स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी

प्रत्यक्षात evm वर 2 लाख 25 हजार 485 ही मतदान झालेली आकडेवारी आहे, तर प्रत्यक्षात मतमोजणीत मात्र 2 लाख 24 हजार 090 एवढीच मते दिसत आहेत. ही खरोखरच धक्कादायक बाब म्हणावी लागेल. आज आमच्यासह इतर अपक्ष उमेदवार सौ. शैलाताई धनंजय गोडसे व सिध्देश्वर अवताडे यांना पडलेली मते देखील मनाला न पटणारी आहेत.

या शिवाय आम्हाला कालपासून विविध ठिकाणांहून फोन येत आहेत की, आम्ही आपल्याला मतदान केले आहे. मात्र आमच्या बुथवर मात्र आपणास ‘शुन्य’ मते दर्शवित आहेत. म्हणुन आम्ही “स्वाभिमानी शेतकरी संघटना” या पोटनिवडणुकीच्या निवडणूकीच्या संशयित प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयात “याचिका” दाखल करणार आहे..

Leave a Reply

error: Content is protected !!