माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जागवल्या नानांच्या आठवणी

सरकोलीत जाऊन वाहिली श्रद्धांजली

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांचे निधन झाले होते. आज मंगळवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सरकोली येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन स्व. भारतनाना भालके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी भारत नानांच्या आठवणीला उजाळा दिला. नानांच्या कार्याचे कौतुक केले. मतदारसंघाच्या विकासासाठी भारत नाना मोठ्या चिकाटीने पाठपुरावा करीत होते.सर्व सामान्य माणसांशी त्यांची नाळ जुळली होती, त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत त्यांना यश मिळत होते असेही सांगितले.

यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अशफाक बळोरगी, सोमपा गटनेते चेतन नरोटे, पंढरपुर तालुका अध्यक्ष प्रकाश तात्या पाटील, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, युवक जिल्हा अध्यक्ष नितीन नागणे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष नंदकुमार पवार, दिलीप जाधव, आरिफ पठाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!