लातूर : ईगल आय मीडिया
राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे बुधवारी पहाटे पुण्यात हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 मुले, 1 मुलगी, पत्नी, नातू माजी मंत्री संभाजीराव पाटील निलनगेकर असा परिवार आहे. त्यांच्यावर आज निलंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पाटील यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला होता, त्यावर त्यांनी मातही केली होती, मात्र बुधवारी पहाटे त्यांचा जीवन संघर्ष थांबला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग असलेले शिवाजीराव निलंगेकर हे संघर्षाशील आणि शिस्तप्रिय होते. त्यांनी 1958-86 साली मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पहिला. नंतर विलासराव देशमुख मंत्रिमंडळातही पाटील कॅबिनेट मंत्री म्हणून सामील होते.
या वयातही त्यांचे मतदारसंघात बारकाईने लक्ष असायचे. त्यांच्या निधनानंतर लातूर जिल्ह्यात शोक व्यक्त होत आहे.