अहमदनगर : ईगल आय मीडिया
नगर शहरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते,माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे हृद्यविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे.
राठोड यांना 8 दिवसांपूर्वी नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. 1995 सालच्या युती सरकार मध्ये अनिल राठोड मंत्री होते. नगर शहरात शिवसेना मजबुतीने उभा करणारा आणि मोठा जनाधार असलेला नेता गमावल्याने शिवसेनेवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर सकाळी10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.