मा.आ. गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा : व्हेंटिलेटर काढले

टीम : ईगल आय मीडिया

सांगोल्याचे माजी आम.गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे अशी माहिती माजी आम.गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली. आज सकाळी यासंदर्भात प्रतिनिधी शी बोलताना ही माहिती दिली.

डॉ.देशमुख यांनी दिलेल्या माहिती नुसार, हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे पथक आबांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. मंगळवारी रात्री व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे. रात्री बायपेप मशिनद्वारे त्यांची श्वसन क्रिया सुरू आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके, ऑक्सिजनचे प्रमाण नॉर्मल होत असून उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत आहेत असेही डॉ.देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, आबांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजल्यापासून सांगोला तालुक्यातील गावागावात दुःखाचे सावट पसरले आहे. कार्यकर्ते एकमेकांना आबांच्या तब्येतीविषयी विचारपूस करताना दिसत आहेत. तर मंगळवारी दुपारनंतर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी अश्विनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. रुग्णालय परिसरात शेकडो कार्यकर्ते सोलापूरात तळ ठोकून आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!