माजी आमदार माणिकराव जगताप यांचे कोरोनामुळे निधन

टीम : ईगल आय मीडिया

महाड चे माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे काल रात्री उशिरा उपचार सुरू असताना कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 54 वर्षांचे होते. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. 

कोविडची लागण झाल्याने  त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा महाड येथील त्यांच्या निवास स्थानावरून निघेल.


विद्यार्थी काँग्रेसमधून माणिकराव जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते. सध्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर ते राष्ट्रवादीत दाखल झाले . 2004 साली ते रााष्ट्रवादी काँग्रेस कडूूून विधानसभेत निवडून गेले होते. मात्र 2009 साली पराभव झाल्यानंतर परंतु पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले होते.

रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम जगताप यांनी केले. त्यांच्यामागे पत्नी , मुलगा , मुलगी, भाऊ , नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!