माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना

टीम : ईगल आय मीडिया

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना दिल्लीती एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. एम्समध्ये ट्रॉमा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एम्स हॉस्पिटल प्रशासनाने ही माहिती दिली आहे. 10 वर्षे देशाचे पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग ८८ वर्षांचे आहेत.

देशात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून मनमोहन सिंग यांनी कालच पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. मनमोहनसिंग यांनी करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणा आणण्यासाठी पत्रातून काही उपाय सरकारला सुचवले होते.

या पत्राला आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उत्तर दिलं. मनमोहन सिंग यांनी सांगितलेले सर्व उपाय आपण आठवड्याभरापूर्वीच सुरू केले आहेत, असं केंद्राने म्हटलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!