पंढरपूर : प्रतिनिधी
भाळवणी ( तालुका पंढरपूर ) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी ६ जणांची नियुक्ती कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी सोमवारी केली. या सर्व नूतन संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक मागील वर्षी संपन्न झाली. त्यावेळी संचालक होण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यापैकी काही कार्यकर्त्यांना काळे यांनी तज्ञ संचालक म्हणून संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी काळे यांनी ६ कार्यकर्त्यांची तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
ज्योतीराम पोरे ( वाखरी ), शंकर चव्हाण (आढीव), बाळासाहेब माने (चळे), दिनकर डोंगरे (पोहरगाव), भारत आंबुले (तिसंगी) विश्वास उपासे ( पटवर्धनकुरोली), विक्रमसिंह बागल (गादेगाव) या सात जणांची तज्ञ संचालक म्हणून निवड केली आहे.
या निवड झाल्याबद्दल सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, व्हाईस चेअरमन भारत कोळेकर, राष्ट्रवादी युवकचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक व मान्यवर उपस्थित होते.