रासायनिक खताची टंचाई दूर करावी

बळीराजा करणार बोंबाबोंब आंदोलन : जिल्हाध्यक्ष जवळेकर यांचा ईशारा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्ह्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये रासायनिक खताचा तुटवडा जाणवत आहे, शेतीला कोरोनाच्या महामारी मध्ये बळीराजा मेटाकुटीला आला आहे. खत दुकानदार व विक्रेते आता शेतकऱ्यांना रासायनिक खताचा तुटवडा भासवून लुटत आहेत. जिल्ह्यात रासायनिक खतांची टंचाई दूर करावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना बोंबाबोंब आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर यांनी दिला आहे.

खतांच्या टंचाई संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर श्री.रविद्र माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष रामदास खराडे, शेतकरी सुजय मोटे, रामेश्वर झांबरे, सतीश देशमुख, रणजित शिंदे,औधुबर सुतार, तानाजी सोनवले शेतकरी उपस्थित होते.

जिल्ह्या मधील सर्व विक्रेते कंपनीचे डिलर यांच्याबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांना एक रुपयासुद्धा जादा दराने विक्री करु नये व त्यांना तसे मुबलक खत विशेषता:युरिया उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी व जादा दराने खत विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले जाईल असा ईशारा देण्यात आला.

Leave a Reply

error: Content is protected !!