फलटण – पुणे रेल्वेचा शुभारंभ पुढील महिन्यात

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते शुभारंभ होणार

टीम : ईगल आय मीडिया

फलटण ते पुणे या मार्गावर लवकरच रेल्वे धावणार असून मार्च महिन्यात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या रेल्वेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती भाजप चे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

बुधवार ( दि. 10 रोजी ) दिल्लीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, आमदार प्रशांत परिचारक, आमदार जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राहुल कुल, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी भेट घेऊन फलटण पुणे रेल्वेच्या शुभारंभासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना निमंत्रण देण्यात आले. त्यांनी पुढील महिन्यात शुभारंभासाठी येतो असे आश्वासन दिले आहे.

खा.नाईक – निंबाळकर यांच्या पाठपुराव्यानंतर मागील वर्षीच या मार्गावर रेल्वे चाचणी घेण्यात आली आहे.

गेली अनेक वर्ष झाली फलटण – बारामती – पंढरपूर या रेल्वेच्या प्रश्ना वर प्रयत्न सुरू होते. परंतु माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी या कामाला खऱ्या अर्थाने गती दिली. सातत्याने रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन रेल्वे सुरू करण्याबाबत तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात येत होता.

त्यामध्ये त्यांना यश आले गेल्या 1 वर्षापूर्वी फलटण लोणंद रेल्वे ट्रायल सुरू झाली, त्यामध्ये काही अडचणी आहेत का याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या व खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी गेल्या महिन्यामध्ये फलटण येथे रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन फलटण – पुणे रेल्वे रोज सुरू व्हावी यासाठी भूमिका घेतली.

ही रेल्वे सुरू झाल्यास रेल्वेच्या उत्पादनामध्ये भर पडणार आहे, तसेच फलटण, माण, खटाव, माळशिरस या भागातून पुण्याकडे जाणारा शेतीमाल रेल्वेच्या माध्यमातून जाऊ शकतो व शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. तसेच आज अनेक मुलं-मुली पुणे येथे शिक्षणासाठी राहत आहेत त्यांनाही याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. फलटण हे भविष्यामध्ये औद्योगिक कॉरिडॉर सेंटर होणार असल्यामुळे पुण्यावरून फलटणकडे येणाऱ्या नोकरदारांची संख्या खूप आहे. त्यांनाही या रेल्वेचा फायदा होऊ शकतो तसेच फलटण व परिसरातील तालुक्यातील सर्व व्यापारी या नाही याचा फायदा होऊ शकतो.

त्यामुळे ही रेल्वे सुरू होणे खूप गरजेचे आहे, ही बाब अधिकाऱ्यांच्या व मंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. व पुढील महिन्यांमध्ये रेल्वेमंत्र्यांच्या शुभ हस्ते फलटण – पुणे रेल्वे सुरू होणार आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली

Leave a Reply

error: Content is protected !!