50 टक्के शिक्षकांना शाळेत उपस्थितीची परवानगी

राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

टीम : ईगल आय मीडिया

राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय हा ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण, दूरस्थ शिक्षण, टेलि काऊन्सिलिंग आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील ५० टक्के शिक्षक व शिकक्षकेतर कर्मचारी यांनी ऑनलाइन, ऑफलाइन, दूरस्थ शिक्षण संस्थांशी संबंधित कामांसाठी तातडीने कामावर रुजू व्हावे असे सरकारने म्हटले आहे.

करोना आणि लॉकडाउन यामुळे राज्यातील शाळा १५ जून २०२० ला सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करुन स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या. त्यासाठीचे निर्णय संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहमतीने घेतले गेले.

राज्यातील शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था ३१ ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थी व नियमित वर्गासाठी बंद राहतील मात्र ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण आणि दूरस्थ शिक्षण सुरु करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!