मुख्यमंत्र्यां समोरच मग अतिरिक्त एस पी नी, एस पीना लाथा – बुक्क्यांचा प्रसाद दिला.
टीम :ईगल आय मीडिया
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यात बंदोबस्तावर असलेल्या दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एकमेकांना मारहाण केली. विशेष म्हणजे ही मारहाण मुख्यमंत्री यांच्या समोरच झाली. हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री जय राम ठाकूर हे दोन दिवसांच्या कुल्लू दौर्यावर आहेत. दुपारी भुंतर विमानतळावर पोहोचलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी स्वागत केले. केंद्रीय मंत्र्यांचा ताफ्याचा विमानतळ सोडताना पोलिस अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली.
नितीन गडकरी कुल्लू विमानतळावर दुपारी दाखल झाले. यावेळी विमानतळाबाहेर फोरलेन प्रकल्पाने बाधित असलेले काही शेतकरी तिथे दाखल झाले होते. त्यांचे विमानतळाबाहेर निदर्शने सुरु होती. यावरुन मुख्यमंत्र्याचे सेक्युरिटी इंचार्ज अॅडिशनल एसपी बृजेश सूद यांना राग आला. याच मुद्द्यावरुन त्यांनी कुल्लूचे एसपी गौरव सिंह यांच्याशी वाद घातला. या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत बघायला मिळालं
मुख्यमंत्र्यांसमोर सर्व प्रकार विशेष म्हणजे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासमोर संबंधित प्रकार घडला. एसपी गौरव सिंह यांनी एएसपी बृजेश सूद यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर सूद यांनी सिंह यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला.
केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये अशाप्रकारे झडप होणे, निंदणीय असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून दिली जात आहे. या प्रकरणाचे आता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक शिमला येथून कुल्लूच्या दिशेला रवाना झाले.
घटनास्थळी उपस्थित लोक आणि अधिकारी यांनी हस्तक्षेप केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गदारोळानंतर डीआयजी सेंट्रल रेंज मंडी मधुसूदन यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात दोन्ही अधिका्यांना शिक्षा होऊ शकते.