इ. 10 वी रिपीटर विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा : अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात

https://cet.11thadmission.org.in

वरील लिंकवरून cet परीक्षा फॉर्म भरा

टीम : ईगल आय मीडिया

इयत्ता 10 वीच्या रिपीटर विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. या रिपीटर विद्यार्थ्यांना तसेच सीबीएसई, ईसीएसइ तसेच इतर मंडळाच्या परीक्षा पास विद्यार्थ्यांना cet परीक्षा अर्ज भरण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाचे नवीन पोर्टल आज (दि.28 ) दुपारी 3 वाजल्यापासून सूरु झाले आहे. त्या पोर्टलवर आजपासून 2 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

या संदर्भातील सूचना पत्र मंडळाच्या वतीने काल ( दि.27 रोजी) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 2020 साली इयत्ता 10 पास, किंवा ऑक्टोबर, मार्च मध्ये उत्तीर्ण पुन:परिक्षार्थी ( रिपीटर ) ज्या विद्यार्थ्यांना सीईटी साठी अर्ज दाखल करायचा आहे त्यांनी आज ( दि. 28 जुलै ) दुपारी 3 वाजल्यानंतर 2 ऑगस्ट च्या रात्री 11.59 पर्यंत आपला अर्ज पोर्टलवर भरायचा आहे.

अर्ज भरण्यासाठी ईमेल आयडी, पूर्वीचा मोबाईल नंबर अपडेट करणे किंवा नव्याने अर्ज भरताना मोबाईल नंबर आवश्यक आहे. परीक्षेचे माध्यम विद्यार्थ्यांनी निवडायचे आहे. सेमी इंग्लिश विकल्प निवडल्यास विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांच्या प्रश्नासाठी इंग्रजी माध्यम आली. विद्यार्थ्यांनी त्याच्या निवासस्थानाचा पत्ता द्यायचा आहे, त्यानुसार त्याचे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येणार आहे.

या विद्यार्थ्यांना 178 रुपये बँकिंग चार्जेस, पेमेंट गेटवे चार्जेस भरावे1लागणार आहेत. यापूर्वी 10 विचा परीक्षा फॉर्म भरताना ज्यांनी sebc प्रवर्गाची नोंदनीं केली असेल त्यांनी आता खुला किंवा ews हा प्रवर्ग निवडावा अशा सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!