महाराष्ट्राच्या ग्रामीन भागात चित्रीकरण करावे : खा.पवार

अभिनेत्री अलका कुबल यांनी घेतली पवारांची भेट

टीम : ईगल आय मीडिया


पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे चित्रपट आणि मालिका निर्मात्यांनी शहरात चित्रीकरण करण्या बरोबरच ग्रामीण भागामध्ये विविध पर्यटन स्थळे आणि गावागावांमध्ये असलेल्या लोकेशनचा देखील वापर करावा, त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी केल्याचे सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी सांगितले.

सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल  यांनी आज सकाळी ( रविवारी ) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीतल्या “गोविंदबाग” या पवारांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, निर्माते-दिग्दर्शक समीर आठल्ये, ज्येष्ठ अभिनेत्री प्राजक्ता दिघे, आ. मकरंद आबा पाटील, निखील घाडगे आदी उपस्थित होते. अलका कुबल यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मालिकांचे चित्रीकरण, कोरोनामुळे येणार्‍या अडचणी आणि आगामी प्रोजेक्ट संदर्भात चर्चा केली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पवार साहेबांबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांनी ग्रामीण भागाकडे चित्रिकरण करावे, असा आग्रह पवार यानी व्यक्त केला आहे.

वर्षभरापूर्वी “आई माझी काळूबाई” या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान सेटवरील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री अशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यावेळी शरद पवार यांनी सेटवरील सर्व कलाकारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली होती आणि भेटीचे निमंत्रण दिले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!