राज्याचे लक्ष लागले : वादग्रस्त वक्तव्यानंतर राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल
टीम : ईगल आय मीडिया
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा नोंद होताच नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच नारायण राणे यांना अटक होणार का ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं बेजबाबदार आणि वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळेच राज्यभरातून शिवसैनिक संतप्त झाले आहेत. राणे यांच्या विरोधात महाड पोलिसांत ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांची जीभही घसरली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन नाशिक शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिक शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
त्यानंतर नाशिक पोलिस आयुक्तांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे.
महाडचे युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर याच्यां तक्रारीनंतर नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 189, 504, 505(2) आणि 506 या कलमांतंर्गत नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजप कार्यकर्त्यांवरही आपत्ती व्यवस्थापन अतंर्गत गुन्हा दाखल केला गेला आगे. शंभर ते सव्वाशे जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
त्यांच्याविरोधात महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांच्याविरोधात महाडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्र्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यावरून नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.