प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला पुन्हा मुदतवाढ

आता दि. २१ सप्टेंबर पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कोरोनामुळे प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळण्यास झालेला विलंबाचा विचार करून प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी शासनाने आणखी एकदा मुदत वाढ दिली आहे. 21 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे.


‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनसाठी आणखी एकदा मुदत वाढ दिली असून विद्यार्थ्यांना आता दि. २१ सप्टेंबर २०२० अखेर पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज डीटीईच्या वेबसाईटवरून भरता येणार आहेत. या अगोदर रजिस्ट्रेशन करण्याची मुदत ४ सप्टेंबर दिली होती. आता विद्यार्थ्यांना आता २१ सप्टेंबर पर्यंत मुदत दिल्याने इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी संधी मिळणार आहे.’ अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) पंढरपूरचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.

यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावरती दि.२४ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्याची दुरुस्ती दि.२५ ते २७ सप्टेंबर या दरम्यान करता येईल.
यानंतर विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर दि. २९ सप्टेंबर रोजी पाहता येईल. प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

या मुदतवाढीचा लाभ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच अजून ज्यांना डिप्लोमा अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे परंतु अद्याप ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नाही त्यांना घेता येणार आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे.

डिप्लोमा प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. एस. एस. गायकवाड- मोबा.क्र. ९८९०५६६२८१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी केले आहे.

One thought on “प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला पुन्हा मुदतवाढ

  1. रजिस्ट्रेशन करण्याची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांना चालून आलेली आणखी एक संधी आहे. धन्यवाद

Leave a Reply

error: Content is protected !!