१० माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पंढरपूर : प्रतिनिधी
विधानसभा मतदारसंघात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पंढरपूर नगरपालिकेच्या दहा माजी नगरसेवकांनी प्रवेश केला.खा.अमोल कोल्हे, उमेदवार अनिल दादा सावंत जेष्ठ नेते वसंतराव देशमुख यावेळी प्रमुख उपस्थित होते.
पंढरपूर विधानसभा तिरंगी निवडणुकीत मंगळवारी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष नेहतराव, प्रताप गंगेकर, अक्षय गंगेकर, सुरेश नेहतराव, शंकर पवार, बाळासाहेब नेहतराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
खा. अमोल कोल्हे, उमेदवार अनिल दादा सावंत, वसंतराव देशमुख, दीपक वाडदेकर, सुभाष भोसले, संदीप मांडवे, श्याम गोगाव,अनिता पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.या पक्ष प्रवेशामुळे पंढरपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीत अनिल सावंत यांनी जोरदार आव्हान उभा केले असून तीन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी यांच्यासह विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. आता पाच माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजप आणि काँग्रेसला ही फटका बसला आहे.
खासदार अमोल कोल्हे साहेब सांगतायत पंजाला मतदान करा