आगलावेवाडीमध्ये डाक विभागाच्या पंचतारांकित ग्राम योजनेचा प्रारंभ


पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा
पंढरपूर डाक विभागातील आगलावेवाडी, ( ता. सांगोला ) या गावामध्ये भारतीय डाक विभागाच्या वतीने  पंचतारांकित ग्राम योजनेचा प्रारंभ केंद्रीय दूरसंचार आणि दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे  यांच्या हस्ते ऑनलाइन (विडीओ कॉन्फरन्स) पद्धतीने शुभारंभ करण्यात आला.


या प्रसंगी आगलावेवाडी येथील सरपंच, प्रशासक, ग्रामसेवक आणि भारतीय डाक विभाग पंढरपूर डाक विभागाचे अधिक्षक एन. रमेश, सहायक अधिक्षक  आर. बी. घायाळ, डाक निरीक्षक मंगळवेढा एस. आर. गायकवाड आदी मान्यवर यांच्या उपस्थितत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल व सामाजिक सुरक्षेचे सर्व निकष पाळत पार पडला.
या  योजनेसाठी पंढरपूर डाक विभागातील प्रायोगिक तत्त्वावर आगलावेवाडी या गावाची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय डाक विभागाच्या विविध पाच प्रकारच्या योजना या गावातील प्रत्येक घराघरात पोहोचविण्याचा आणि त्याद्वारे भारत सरकारच्या आर्थिक समावेशकतेच्या धोरणामध्ये ग्रामीण जनतेस समाविष्ट करून घेणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

यामध्ये बचत बँकेच्या विविध योजना, मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, इंडिया पोस्ट पेमेंट बँक चे खाते, टपाल जीवन बिमा आणि ग्रामीण टपाल जीवन बिमा तसेच प्रधानमंत्री सुरक्षा आणि जीवन ज्योती बिमा योजना या योजना राबविण्यात येतील.


या योजनेचा शुभारंभ ऑनलाइन पद्धतीने विडीओ कॉन्फरन्सद्वारे केंद्रीय दूरसंचार आणि दळणवळण राज्यमंत्री भारतीय सरकार संजयजी धोत्रे, भारतीय डाक विभागाचे सचिव प्रदीप्त कुमार बिसोई, डायरेक्टर जनरल भारतीय डाक विभाग नवी दिल्ली विनीत पांडे आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे करण्यात आला.


ग्रामस्थांनी या पंचतारांकित ग्राम या भारतीय डाक योजनेमध्ये  सहभागी होऊन  जास्तीत जास्त लोकांनी पोस्टाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अधिक्षकााच्या वतीने  करण्यात आले. 

Leave a Reply

error: Content is protected !!