पंढरीत भिंत कोसळून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू
पंढरपर : ईगल आय मीडिया
विठ्ठल मंदिरा जवळ असलेल्या तांबेकर गल्ली येथे जुन्या बांधकामाची भिंत कोसळून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आजच त्याचा वाढदिवस होता आणि आजच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 4 वाजता घडली.
येथील तांबेकर गल्ली येथे एका जुन्या वाड्याचे पाडकाम सुरू आहे. याठिकाणी जुनी भिंत पाडण्याचे काम सुरु असताना. अचानक भिंतीचा भाग रस्त्यावर कोसळला. यामध्ये गल्लीत खेळणारा पाच वर्षीय श्लोक रविंद्र घन यांचा भिंतीखाली दबुन मृत्यु झाला आहे.
यामध्ये श्लोकचा हात जागेवर निकामी झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यु झाला आहे. श्लोक च्या पालकांनी घर मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.