भीमेच्या पूर नियंत्रणासाठी शासकीय कमिटी

माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील भीमा काठच्या लोकांशी चर्चा : पूर बाधित गावांना भेटी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पूर नियंत्रणासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासंदर्भात नियुक्त कमिटीचे पथक दोन दिवसांपासून जिल्ह्यात दौऱ्यावर आले आहे. या पथकाने भीमा नदीच्या पूर पट्ट्यात जाऊन लोकांशी चर्चा सुरू केली असून आज हे पथक पंढरीत येत आहे.

भीमा नदीला येणारा पूर आणि शेतीचे गावचे होणारे नुकसान त्या वर पूर व नियोजन व उपयोजन काय करता येतील या साठी महाराष्ट्र शासनाने उपसमिती नेमली आहे. त्या समितीचे अध्यक्ष माजी सचिव जलसंपदा विभाग श्री.राजेंद्र चव्हाण यांनी काल ( दि.28 रोजी ) नीरा नरसिंहपूर , (ता.माळशिरस ) व पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये भेटी देऊन स्थानिक पातळीवर चर्चा केली. व प्रत्यक्ष पूर नियंत्रण रेषा व त्या बाबत माहिती घेऊन पुढील काळात काय नियोजन करता येईल यांची माहिती घेतली.

मागील 10 दिवसांत पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणांतील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. 19 पैकी 14 धरणांची पातळी 70 टक्के हुन अधिक झाली आहे. त्यापैकी 3 धरणे 100 टक्के तर 7 धरणे 80 टक्केहून अधिक भरली आहेत. त्यामुळे आता उजनी धरण लवकरच भरून भीमेला पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शासनाने पुराच्या नियोजनासाठी समिती तयार केली असून या समितीने भीमा नदीच्या पूर पट्ट्यात जाऊन लोकांशी चर्चा सुरू केली आहे.

पूराचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करून नदी काठच्या भागांना नुकसान होण्यापासून कसे पाणी रोखता येईल यावर उपाय करू असे संगीतले. तर हे पथक आज पंढरपूर शहरात येऊन पूर परिस्थिती बाबत प्रशासनासोबत चर्चा करणार आहे.त्यामुळे यंदा पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासन वेळेवर जागे झाल्याचे दिसून येते.

Leave a Reply

error: Content is protected !!