उजनीचा विसर्ग ३० हजार क्यु. : पुणे जिल्ह्यातील ७ तर नीरा खोऱ्यातील 3 धरणे 100 टक्के
पंढरपूर : ईगल आय न्यूज
पुणे जिल्ह्यातील २० पैकी ७ तर नीरा खोऱ्यातील ५ पैकी ४ धरणे शंभर टक्के भरलेली आहेत, त्यामुळे उजनी आणि वीर धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे. पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनी आणि वीर धरण प्रशासनाने शनिवारी सकाळपासून धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवारी सायंकाळी चार वाजता वीर मधील विसर्ग ६१ हजार तर उजनी धरणातील विसर्ग ३० हजार क्युसेक्स पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे रविवारी दुपारनंतर पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीची पाणी पातळी वाढणार आहे. परिणामी भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील विसापूर, कळमोडी, चासकमान, वडिवळे,आंध्रा आणि टेमघर हि सात धरणे १०० टक्के तर नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नाझरे हि तीन धरणे १०० टक्के भरली आहेत. नीरा देवघर धरन हि ९९ टक्के आणि गुंजवणी ९२ टक्के भरली आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्यातील डिंभे, घोड, पवना, कासारसाई, मुळशी, वरसगाव, पानशेत, खडकवासला हि धरणे ९० टक्केहून अधिक भरली आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ६ धरणांतून विसर्ग सुरु झालेला आहे.
शनिवारी दुपारी सव्वा चार वाजता वाजता निरा नदीमध्ये वीर धरणाच्या सांडव्याद्वारे ५३ हजार ८४७ क्यसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.त्यामुळे नीरा नदीचा एकूण विसर्ग ६१ हजार १९७ क्युसेक्स इतका आहे. तर उजनी धरणातून दुपारी ३ वाजता ३० हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. त्यामुळे रविवारी दुपारनंतर पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीची पाणी पातळी वाढणार आहे.