महापूर, अतिवृष्टी अनुदान वितरण सुरू

पहिल्या टप्प्यात 55 गावे पूर्ण होणार : शेतकऱ्यातून समाधान

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यात नुकत्याच आलेल्या महापूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात 58 कोटी रुपये उपलब्ध झाल्याने एवढ्या रकमेतून 55 गावातील सर्व बाधितांना अनुदान वितरण होणार आहे.

राज्य शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला असून पहिल्या टप्प्यात 58 कोटी रुपये मिळाले आहेत, त्याचे वितरण सुरू झाले असून सर्व बाधितांच्या खात्यावर बँकेत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच उर्वरित 40 कोटी रुपये मिळणार आहेत, ती मिळाले की संपूर्ण तालुक्यातील नुकसान भरपाई अडा करण्यात येईल. – सचिन ढोले , प्रांताधिकारी, पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीला महापूर आला होता, तसेच अतिवृष्टी झाल्याने शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले होते आणि जनावरे सुद्धा दगावली होती. या नुकसानीचे अतिशय जलद गतीने पंचनामे केल्यानंतर तालुक्यासाठी सुमारे 98 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणे गरज निर्माण झाली होती.

दरम्यान अतिवृष्टी, महापूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, मिळालेल्या अनुदानामुळे रब्बी हंगामातील शेतीच्या कामासाठी मदत होणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!