उजनीतून भीमेचा विसर्ग 20 हजार क्यूसेक्स

दौंडसह बंडगार्डन ची आवकही वाढली

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे शनिवारी रात्री 9 वाजल्यापासून भीमा नदीला 5 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडण्यात होते. आज सकाळी 6 वाजता 10 हजार क्यूसेक्स तर सकाळी 8 वाजता यामध्ये वाढ करून 20 हजार क्यूसेक्स ने विसर्ग सुरू केला आहे.

संबंधित बातमी वाचा

दरम्यान काल पुणे जिल्ह्यात ही दमदार पाऊस झाला आहे, त्यामुळे दौंड येथील पाण्याचा प्रवाह 10 हजार 551 क्यूसेक्स तर बंडगार्डन ही 9 हजार 50 क्यूसेक्सपर्यंत वाढला आहे. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणात 108.76टक्के इतका पाणी साठा झाला आहे.

हवामान खात्याने पुढील 4 ते 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

दरम्यान, निरेच्या खोऱ्यात ही काल मध्यम ते जोरदार पाऊस झाल्याने वीर धरणामधून नीरा नदीला 4 हजात 637 क्यूसेक्स ने पाणी सोडले आहे. शिवाय माळशिरस, माढा, पंढरपूर या तालुक्यात शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने भीमेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!