वाखरीत बिबट्या सदृश्य प्राण्याने दोन वासरांवर केला हल्ला

माळी मळा परिसरातील घटना

टीम : ईगल आय मीडिया

वाखरी ( ता.पंढरपूर ) परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात एक वासरू ठार झाले आहे तर अन्य एक वासरू जखमी झाले आहे. भांडीशेगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी अशाच प्राण्याने हल्ला करून एक गाय मारलेली आहे. त्यामुळे या प्राण्याने वाखरी परिसरात पळ काढला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वाखरी येथील योगेश पांढरे यांच्या शेतातील घराशेजारी बांधलेल्या जनावरापैकी सुमारे 5 ते 6 महिन्यांच्या दोन कालवडी वर हल्ला केला आहे.त्यापैकी एक कालवड ठार झाली तर एक जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

तसेच संबंधित प्राण्याचा ठशाची पाहणी केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा वन्य प्राणी तरस असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे वाखरी परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!