पंढरीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली


प्रतिनिधी : पंढरपूर

 माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त माजी आ.प्रशांत परिचारक व पंढरपूर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी श्रद्धांजली वाहिली.

स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक संसदीय विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली.

“अटलजी हे एक दूरदर्शी राजकारणी, हुशार वक्ते, विद्वान साहित्यिक आणि एक ज्येष्ठ संसदपटू होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्राच्या निस्वार्थ सेवेसाठी समर्पित केले.” राष्ट्र उभारणीतील त्यांचे योगदान नेहमीच सन्मानाने लक्षात ठेवले जाईल, असे प्रतिपादन यावेळी परिचारक यांनी केले.  

यावेळी उपस्थितीत माऊली हळणवर, प्रणव परिचारक, विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, धर्मराज घोडके, बसवेश्वर देवमारे, दिपक येळे, लाला पानकर, सुनिल भोसले, राहुल परचंडे, गुरू दोडीया, संभाजी शिंदे नाईक, आण्णा धोत्रे, प्राजक्ता बेणारे, कैलास कारंडे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व युवक सहकारी मित्र उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!