एकाच कुटुंबातील 4 मुलांचा भीमा नदीत बुडून मृत्यू

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुर्घटना

सोलापूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यातील मामी आणि भाच्याचा भीमा नदीच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची शुक्रवार ची घटना ताजी असतानाच शनिवारी एकाच कुटुंबांतील चौघा बालकांचा भीमानदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी लवंगी ( ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर ) येथे गावात घडली आहे.

याबाबतची सविस्तर घटना अशी की, शनिवारीदुपारी ३:३० वाजता लवंगी येथे राहणारे शिवाजी रामलिंग तानवडे (वय ४० वर्षे) हे भीमा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. तेथे थोड्या वेळाने त्यांच्या मागे त्याच्या दोन मुली समीक्षा व आर्पिता आणि सोबत मेव्हण्याचा मुलगा विठ्ठल व मुलगी आरती असे चौघे नदीकडे आले. तेव्हा त्यांना घराकडे जायला सांगून देऊन शिवाजी हे पोहत नदीमध्ये आत गेले. पण थोड्या वेळाने ते चौघे परत नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले.

1) समीक्षा शिवाजी तानवडे ( वय १३ वर्ष ) 2) अर्पिता शिवाजी तानवडे ( वय ११ वर्ष ) 3) आरती शिवानंद पारशेट्टी ( वय १२ वर्ष.), 4) विठ्ठल शिवानंद पारशेट्टी (वय १० वर्ष ) अशी भीमा नदीत बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

समीक्षाला पाण्यात पोहत असताना आरतीने पकडले व अर्पितास विठ्ठल याने पकडल्याने ते चौघे बुडत असताना त्यांचा आवाज ऐकून शिवाजी लगेच त्यांच्याजवळ पोहत गेला. त्यानंतर त्याने समीक्षा व आरती यांना थोडेसे बाजूला किनाऱ्याजवळ सोडून त्यांना किनाऱ्यावर जाण्यास सांगितले.

अर्पिता व विठ्ठल यास सोबत कडेला आणत असताना पाहिले असता समीक्षा व आरती या पाण्याच्या प्रवाहामुळे बुडाल्या व शिवाजीच्या ताब्यातील विठ्ठल व अर्पिता पण निसटले व ते पण बुडून गेले. हे पाहून शिवाजीचा ही धीर सुटल्याने तो पण बुडू लागला. हे पाहून त्याचे नातेवाईक राचाप्पा उर्फ अप्पू संगप्पा पारशेट्टी याने शिवाजी रामलिंग तानवडे यास बाहेर काढले.

Leave a Reply

error: Content is protected !!