दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळा 46 विद्यार्थी पॉझिटिव्ह
टीम : ईगल आय मीडिया
अंत्रोळी ( ता. दक्षिण सोलापूर ) येथील मतिमंद निवासी विद्यालयातील 46 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील एकाच शाळेतील एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी सापडल्याची पहिलीच घटना आहे. राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा आदेश दिल्यानंतर अंत्रोळी येथील मतिमंद मुलांची शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत जिल्हाभरातून विद्यार्थी दाखल झाले आहेत.
त्यांच्यापैकी काही विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने बुधवारी चाचणी करण्या आली. त्यावेळी 21 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले तर आज गुरुवारी पुन्हा तपासणी केल्यानंतर एकूण 46 विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील निवासी विद्यालयात अशी घटना प्रथमच घडली असून आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव घटनास्थळी गेले आहेत.