नेवरे – नांदोरे पुलासाठी निधी द्या !

सार्व.बांधकाम मंत्र्यांकडे आ.मोहिते पाटील यांची मागणी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भीमा नदीवर नेवरे ते नांदोरे या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाच्या दुरुस्ती साठी 50 लाख रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आम.रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या पत्रावर पुढील कार्यवाहीसाठी ना.चव्हाण यांनी संबंधित विभागाला सूचना केली आहे. त्यामुळे लवकरच या धोकादायक बनलेल्या पुलाची दुरुस्ती होणार आहे.

नेवरे ( ता.माळशिरस ) आणि नांदोरे ( ता. पंढरपूर ) या दोन्ही गावांना जोडणारा पूल भीमा नदीवर आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात वारंवार आलेल्या पुरामुळे रेलिंग, जोडरस्ते यासह पुलाचे मोठे नुकसान झाले असून वाहतुकीसाठी पूल धोकादायक बनलेला आहे. त्यामुळे पुलाच्या दुरुस्ती ची गरज निर्माण झाली आहे.

नुकतेच आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना समक्ष भेटून या पुलाच्या दुरुस्ती साठी 50 लाख रुपये निधीची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेऊन ना. चव्हाण यांनी तातडीने पुढील कार्यावाहीसाठी बांधकाम विभागास सूचना केल्या आहेत.

यामुळे लवकरच पुलाच्या दुरुस्ती चे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच नेवरे, नांदोरे सह पंढरपूर आणि माळशिरस या दोन्ही तालुक्यातील दळणवळण सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे. तसेच या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!