पंढरपूर : eagle eye news
गादेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सीमा बालाजी बागल यांची बिनविरोध निवड करण्यात आले.निवडी नंतर नूतन सरपंच सीमा बागल यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सरपंच निवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी निवडणूक प्रमुख म्हणून भंडीशेगाव विभागाचे सर्कल दिनेश भडंगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समीर पटेल उपस्थित होते.
गादेगांव ग्राम पंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून सर्वांना समान संधी या धोरणाने प्रत्येकाला १ वर्ष सरपंच पद देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे मागील तीन वर्षात तीन सरपंच झाले आहेत. नुकतेच सौ. दिपाली धनाजी बागल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागी सीमा बालाजी बागल यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी विठ्ठल चे माजी संचालक सूर्यकांत बागल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव बागल, उद्योगपती पद्माकर बागल, मोहन बागल, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, महादेव फाटे, विकास भोसले, मा.सरपंच ज्योती बाबर, ग्रामसेवक जयंत खंडागळे आदी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीनंतर गादेगांवमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.