सार्वजनिक गणेश मूर्ती स्थापनेसाठी परवानगी नाही
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्ती स्थापणेस, मंडप घालून, डॉल्बी लावण्यास आनि विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तथापि घरगुती गणेश मूर्ती स्थापणेस आणि घरीच विसर्जन करणे, online बुकिंग खरेदी, किंवा मूर्ती काराच्या कारखान्यातून खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. शिवाय कायमस्वरूपी असलेली मंदिरे, पारंपरिक मंडप आणि गेल्यावर्षी परवानगी काढलेल्या मंडळांना नियम आणि अटींचे पालन करून गणेश मूर्ती स्थापणेस परवानगी दिली जाणार असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ मिलिंद शंभरकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहे.
मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या गणरायाचे आगमन आता आठवड्याभरावर आले आहे. मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काय सूचना आणि आदेश येतात याकडे गणेश भक्तांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी शंभरकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी संयुक्तिक काढलेल्या परिपत्रकात यंदा गणेश उत्सवावर निर्बंध आले आहेत.
यंदा नवीन मंडळास ऑफ line किंवा online परवानगी मिळणार नाही. 2019 साली ज्या मंडलांनी परवानगी काढली आहे त्यांना परवानगी दिली असली तरी त्यासाठी रस्त्यावर मंडप, स्टेज टाकता येणार नाही. शिवाय 4 फुटांपेक्षा जास्त मोठी गणेश मूर्ती आणता येणार नाही. गणेश मूर्तीच्या आरती साठी 10 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येता येणार नाही. डॉल्बी, स्टेज, मिरवणूक काढता येणार नाही, सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून गणेश उत्सव साजरा करावा लागणार आहे.
घरगुती स्थापणेसाठी मूर्ती खरेदी करताना नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये, online मूर्ती खरेदी करावी, किंवा जिथे मूर्ती तयार केली जाते तिथुन गर्दी न करता मूर्ती खरेदी करावी, घराच्या अंगणातच ती विसर्जित करावी आशा सूचना या पत्रकात करण्यात आलेल्या आहेत.
त्यामुळे यंदा गणेशोत्सव सुद्धा कोरोनाच्या कचाट्यात अडकला असल्याचे दिसून येते.