काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांची मागणी.
माळशिरस : ईगल आय मीडिया
वसुंधरा अभियानाचे अनुषंगाने फटाके मुक्त दिवाळी साजरी करणेचे शासनाच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी सोलापुर जिल्ह्यात फटाके विक्रीस परवानगी दिली नाही याबाबत सोलापुर जिल्ह्यातील फटाके व्यवसायीक डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांना भेटुन आपली व्यथा त्यांचे समोर मांडली. त्यानंतर सोलापुर जिल्ह्यात फटाके विक्रीस परवानगी देणेची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मागणी केली आहे, तसेच याबाबत ईमेलद्वारे निवेदन दिले आहे.
या निवेदनात मध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनेक फटाके विक्रीदार दुकानदाराने रीतसर कागदपत्राची पूर्तता करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाहरकत दाखला घेऊन स्टॉलची फी भरलेली आहे व सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे पाठवले आहेत. स्थानिक पोलिस ठाणे पडताळणी करून सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगीसाठी पाठवले आहेत .
या अनुषंगाने या फटके व्यवसायिकांनी लाखो रुपयांच्या फटाके मालाची खरेदी केली आहे. मागील कोरोना काळात फटाके व्यवसायिक अगोदरच आर्थिक अडचणीत असून या वर्षीही फटाके विक्रीस परवानगी दिली नाही तर, व्यवसायीकाचे आर्थिक नुकसान होईल.