संचारबंदी कालावधी कमी करा

आमदार परिचारक आणि अवताडे यांची अजित पवारांकडे मागणी

पंढरपूर :ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरात आषाढी यात्रेनिमित्त जाहीर करण्यात आलेली संचारबंदी चुकीची असून तिचा कालावधी कमी करण्यात यावा अशी मागणी आम.प्रशांत परिचारक आणि आ. समाधान अवताडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 17 ते 25 जुलै या दरम्यान पंढरपूर शहर आणि आसपासच्या 9 गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी शहरातील व्यापारी, सामान्य विक्रेते तसेच व्यावसायिक लोकांसाठी गैर सोयीची आहे.

त्यामुळे संचारबंदी चा कालावधी कमी करून 19 ते 21 जुलै असा करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. दोन्ही आमदारांनी एकाच निवेदनावर संयुक्त मागणी केली असून राज्य शासन या मागणीची दखल घेणार का याकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!