शहर पोलिसांनी एका तासात घेतला शोध
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गोवा वनविभागात कार्यरत असलेले अधिकारी योगेश बिटीयो वेळीप ( वय २८ वर्षे, रा पनसुलेमळ, कोतीगाव ,कानकोटा दक्षिण गोवा ) हे अचानकपणे २७ फेब्रुवारी रोजी हरवले. याबबत कानकोना पोलिस स्टेशनला मिसिंग दाखल करण्यात आली होती. ते सोलापुर जिल्ह्यात असल्याची प्राथमिक माहिती पोलीस नियंञण कक्षाला मिळाली होती.
यामुळे सदर हरवलेल्या वन अधिकाऱ्यचा शोध सुचना पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी शहर पोलीसांना दिल्या.
यानुसार पो. नि. अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली दोन टीम करीत वन अधिका-यांचा शोधमोहिम राबवण्यात आली. पो नि राजेंद्र मगदुम, उपनिरिक्षक प्रशांत भागवत, पो हवा. देढे, पाटील, सागर माने आदींनी तांञिक विश्लेषणाचे आधार सदर वन अधिका-यास २ मार्च रोजी राञी दीड वाजणेच्या सुमारास महाद्वार रोड येथील भक्त निवास मधुन ताब्यात घेतले.
याचबरोबर कानकोना पोलिस स्टेशनचे पो नि नाईल यांचेशी संपर्क साधत गोवा पोलीस हवालदार दिपक गावकर व भाऊ दशरथ बिटीयो यांचे ताब्यात दिले. सदरची कारवाई माहिती मिळालेपासुन एका तासात पार पाडलेने पंढरपूर पोलीसांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.