बोकडाचे जेवण : संयोजकांसह निलंबित पोलीस, कैदेतील आरोपी विरोधात पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल


पंढरपूर : ईगल आय मीडिया
आंबे येथील बोकडाचे जेवणाचा कार्यक्रम संयोजकासाठी सुद्धा महागात पडला आहे. संयोजक आणि मंगळवेढा पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी व इतर 30 ते 40 जणांविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्यात आंबे गावचे तलाठी प्रकाश तानाजी गुजले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार
बोकड जेवणाचे संयोजक शिवाजी बळीराम भोसले यांच्यासह मंगळवेढा सब जेलमधून आलेला आरोपी तानाजी बळीराम भोसले, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे
पोलीस कर्मचारी बजरंग माने व उदय ढोणे तसेच गावातील इतर 30 ते 40 लोक ( सर्व रा.आंबे तालुका पंढरपूर ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

.17 जुलै रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आरोपी शिवाजी बळीराम भोसले यांचे राहते घरी शासकीय आदेशाचे उल्लंघन करून साथीचे रोगाचा फैलाव होईल याची कल्पना असतानासुद्धा जाणीवपूर्वक बोकड कापून जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमास गावातील 30 ते 40 लोक उपस्थित राहिले, त्याचप्रमाणे मंगळवेढा सब जेलमध्ये अटकेत असलेला तानाजी बळीराम भोसले यास मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उदय ढोणे व बजरंग माने हे दोघेजण यांना जेवणासाठी बोलावले. गावांमध्ये साथीचे रोग फैलावेल अशी कृती केल्याचा आरोप आहे. या जेवणास तानाजी बळीराम भोसले, पोलीस कर्मचारी ढोणे, माने व गावातील इतर 30 ते 40 नागरिक उपस्थित राहिले होते. शिवाजी बळीराम भोसले, तानाजी बळीराम भोसले, पोलीस कर्मचारी ढोणे व माने व गावातील इतर 30 ते 40 लोक यांचे विरुद्ध भा.द.वि कलम 188,269,270 सह आपत्ती व्यवस्थापन 2005 चे कलम 51(b), भारतीय साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 चे कलम 2,3, महामारी रोग सुधारणा अध्यादेश 2020 चे कलम 3(1)(अ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे.
फिर्याद दिल्याने सदर गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बापू मोरे हे करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!