पहिल्या 2 टप्यात सोमवारपासून निर्बंध शिथिल होणार
टीम : ईगल आय मीडिया
राज्यात आज 3 महिन्या नंतरची सर्वात कमी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी राज्यात १३ हजार ६५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ३०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून आजही शुक्रवारच्या तुलनेत कमी रुग्णसंख्या आढळली आहे. दिवसागणिक कमी होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान झालं आहे. राज्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण वाढल्याने रिकव्हरी रेट ९५.०१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ५५,२८,८३४ करोनाबाधितांनी या आजारावर यशस्वीरित्या मात केली आहे. आजपर्यंत ३ कोटी ६२ लाख ७१ हजार ४८३ लोकांच्या तपासण्या झाल्या आहेत. तर ५८ लाख १९ हजार २२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील हे दिलासादायक चित्र पाहता शासनाने पुन्हा एकदा अनलॉक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यामध्ये ५ स्तर करण्यात आले असून ज्या जिल्ह्यांमध्ये कमी रुग्ण आहेत, तेथील निर्बंध प्राधान्याने हटवण्यात येणार आहेत.