दौंडचा विसर्ग 33 हजारावर खाली आला
पंढरीत प्रदक्षिणा मार्गावर महापुराचे पाणी आणि त्यातून फिरणाऱ्या ndrf च्या बोटी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
उजनीतून सोडला जाणारा विसर्ग दुपारी 2 वाजता 20 हजार क्यूसेक्स पर्यंत कमी केला आहे. त्यामुळे उद्या दुपारनंतर पूरस्थिती कमी होऊन जनजीवन सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
महापुरामुळे हैराण झालेल्या भीमा काठच्या नागरिकांना दिलासादायक बातमी असून पाऊस मंदावल्याने उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग सकाळी 8 वाजता 80 हजार क्यूसेक्स पर्यन्त कमी करण्यात आलेला होता.त्यात आणखी घट करून तो दुपारी 2 वाजता 20 हजार क्यूसेक्स पर्यन्त कमी करण्यात आला आहे.
तर वीर चा विसर्ग ही 4 हजार क्यूसेक्स पर्यंत कमी झाला आहे, दरम्यान आज दुपारी पंढरपूर येथे भीमेची पातळी 2 लाख 91 हजार क्यूसेक्स इतकी असून शहरातील मध्यभागात पुराचे पाणी आलेले आहे.
पुणे जिल्ह्यासह उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर मंदावला आहे. त्यामुळे उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग शुक्रवारी 2 वाजता 20 हजार क्यूसेक्स करण्यात आलेला आहे. त्यामुळे भीमेची पूरस्थिती नियंत्रणात राहणार आहे.