Good news : राज्यात 24 तासात 12 हजार 326 रुग्णांना डिस्चार्ज तर 7 हजार 760 नवे रुग्ण

ना. टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे

मुंबई : ईगल आय मीडिया

महाराष्ट्रात मागील २४ तासात १२ हजार ३२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात मागील २४ तासांमध्ये ७ हजार ७६० रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


यासंदर्भात अधिक माहिती देताना ना. टोपे म्हणाले की,
राज्यातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ५७ हजार ९५६ इतकी झाली आहे. यापैकी २ लाख ९९ हजार ३५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला राज्यात १ लाख ४२ हजार १५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत अशी माहिती दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!