आमदार गोपीचंद पडळकर कोरोना बाधित

टीम : ईगल आय मीडिया

भाजपचे प्रवक्ते आणि विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. आ. पडळकर यांना लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. पडळकर मुंबईतील अधिवेशनात सहभागी झालेले असताना सांगलीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आ. पडळकर यांच्या अगोदर आ. अनिल बाबर, आ. सुमनताई पाटील, आ सदाभाऊ खोत, आ. मोहनराव कदम, आ.विक्रम सावन्त, आ. सुधीर गाडगीळ यांनाही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सांगलीचे माजी महापौर हरून शिकलगार यांचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे. तर बधितांपैकी काही जणांनी कोरोनावर मात केली आहे

Leave a Reply

error: Content is protected !!