टीम : ईगल आय मीडिया
खा. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक येथील 4 सुरक्षा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता बारामती येथील गोविंदबाग येथील 4 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर बारामती येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
बारामती शहर आणि तालुक्यात गेल्या 2 महिन्यापासून तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. बारामतीमध्ये आजवर 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा हा प्रादुर्भाव आता थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंद बागे पर्यंत पोहोचला आहे. खा पवार यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
घरकाम व शेतात काम करणाऱ्या 58 वर्षीय, 27वर्षीय, 39 वर्षीय पुरूषाला आणि एका 40 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर शासकीय मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.