छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासनाची नियमावली जाहीर

केवळ 10 लोकांच्या उपस्थितीत करा प्रतिमा पूजन

टीम : ईगल आय मीडिया

शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली तयार केली असून तिच्या नुसार साधेपणाने शिव जयंती साजरी करावी असे आवाहन राज्य सरकारने शिव प्रेमींना केले आहे.

आज ( दि.11 फेब्रुवारी ) रोजी गृह सचिवांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नियमावली जाहीर केली आहे. तसेच त्याच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत आवाहन ही केले आहे.

राज्यात अजूनही कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे, त्यामुळे राज्य सरकारने 19 फेब्रुवारी रोजी साजरी होत असलेल्या शिवाजी महाराज जयंती साठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, व्याख्याने, जाहीर कार्यक्रमास मनाई करण्यात आली आहे.

साधे पणाने केवळ 10 लोकांच्या उपस्थितीत, सामाजिक अंतर पाळून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे, प्रतिमेचे पूजन केले जावे, मास्क, सॅनेटाईजरसह इतर उपाययोजना अमलात आणाव्यात, शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवासाठी गर्दी करू नये असे आवाहन शासनाने केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!