ही 20 गावे अनुसूचित जाती साठी राखीव

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यातील गाडेगाव, भांडीशेगाव, सुस्ते, मेंढापूर अशा गावांचे आरक्षण अनु जातीसाठी राखीव राहिले आहे. अनुसूचित जमाती साठी रोपळे, शेगाव दुमाला आणि तारापूर ही तीन गावे आरक्षित झाली आहेत. या तिन्ही जागी महिलांना आरक्षण मिळाले आहे.

आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू आहे. या 20 ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जाती साठी राखीव झाले आहे. अजनसोंड, भंडीशेगाव, गादेगाव,नारायण – चिंचोली गारडी, तिसंगी, सोनके, आंबे चिंचोली, कोंढारकी, सुस्ते, शेवते,शिरढोन, मेंढापुर, नेपटगाव, चळे, भटुंबरे, पळशी, खरसोळी, उंबरगाव, आव्हे-तरटगाव

येथील शासकीय गोदामात आज तालुक्यातील 94 गावच्या सरपंच आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली आहे. लोकसंख्या निकष ठरवून तालुक्यातील गावे आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये 3 गावे अनुसूचित जमाती साठी राखीव झाली आहेत. तारापूर, रोपळे आणि शेगाव दुमाला या तीन गावचे सरपंच पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!