पोहोरगाव, एकलासपूर, उंबरगाव, भटुंबरे, केसकरवाडी येथे सत्ता
पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील ग्रामपंचायत मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीतील निकाल आले आहेत. त्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार परिचारक गटाने बाजी मारली आहे. पोहोरगाव, एकलासपूर, केसकरवाडी, भटुंबरे, आंबेचिंचोली, उंबरगाव येथे परिचारक गटाने सत्ता कायम ठेवली आहे. तर शेंडगेवाडी येथे परिचारक, काळे गटाची सत्ता आली आहे. सुपली येथे हनुमान ग्रामविकास आघाडीने परिचारक गटावर मात करीत सर्वच्या सर्व 9 जागा जिंकल्या आहेत.
येथील शासकीय धान्य गोदामात तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये पोहोरगाव परिचारक गट 6 तर विठ्ठल परिवार 3 जागा, एकलासपूर परिचारक गट 6 जागा तर परिवार 3 जागा, उंबरगाव परिचारक भालके आणि काळे गट आघाडी 1 जागा तर अपक्ष एका जागी निवडून आला आहे.
शेंडगेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काळे – परिचारक आघाडीला 5 जागा आल्या आहेत. अपक्ष 1 जागी विजयी झाला आहे. 2 जागा बिनविरोध झाल्या आहेत. दुसऱ्या फेरीतील मतमोजणी सुरू असून लवकरच ते निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
शिरगाव ग्रामपंचायतीवरही परिचारक गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. 7 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या तर उर्वरित 2 जागावर परिचारक गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.आंबेचिंचोली ग्रामपंचायत मध्ये परिचारक गट 6 गोडसे गट 2 आणि अपक्ष 1 निवडून आले आहेत. भटुंबरे परिचारक गट 6 आणि भालके काळे गट 3, केसकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत परिचारक गट 6 तर काळे गट 3 जागा निवडून आल्या आहेत.