पंढरपूर तालुक्यात विक्रमी अर्ज

72 ग्रामपंचायतींसाठी 3166 उमेदवार आणि 3333 अर्ज दाखल

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील 72 ग्रामपंचायतसाठी  मंगळवार ( दि 29 रोजी ) एकाच दिवशी 1922 उमेदवारांनि 2006 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. यापूर्वी दाखल झालेले 1 हजार 327 आणि आज अखेरच्या दिवशी दाखल झालेले 2006 असे 3166 उमेदवारांचे एकूण 3333 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

23 डिसेंबर पासून 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर सलग तीन सुट्ट्या आल्यामुळे सोमवार पासून शेवटच्या 3 दिवसांत अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. बुधवार शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी जत्रे सारखी गर्दी उसळली होती. निवडणूक आयोगाने ofline अर्ज घेण्याचे आदेश दिल्याने तसेच अर्ज स्वीकारण्याची वेळ सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढवल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला.

सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत गेटच्या आत आलेल्या सर्व इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याचे काम रात्री 8 वाजेपर्यत चालू होते. पहिल्या 4 दिवसांत 72 ग्रामपंचायत साठी 1927 अर्ज दाखल झाले होते तर बुधवारी 2006 अर्ज दाखल झाले आहेत.

तालुक्यातील कासेगाव, करकंब, भोसे, गादेगाव,वाखरी, भाळवणी, पटवर्धन कुरोली, सुस्ते, खर्डी, सरकोली, रोपळे आदी महत्वाच्या व मोठ्या ग्रामपंचायत निवडनिकीकड तालुक्याचं लक्ष लागले आहे. या पैकी जैनवाडी ग्रा पं बिनविरोध झाली आहे तर, भोसे ग्रामपंचायतीची बिनविरोध होण्याची शक्यता दिसत आहे. 

Leave a Reply

error: Content is protected !!